Wednesday, October 9, 2024
Homeदेश विदेशMaihar Bus Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात! ९ जणांचा जागीच मृत्यू, २४...

Maihar Bus Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात! ९ जणांचा जागीच मृत्यू, २४ जण गंभीर

मैहर | Maihar

मध्य प्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात अपघात झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील बस ही प्रयागराजवरून नागपूरकडं जात होती. तर हायवा ट्रक महामार्गावर उभा होता. भरधाव वेगानं जाणारी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवाला धडकली. या घटनेत बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

हा अपघात मैहर जिल्ह्यातील नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरात झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की जेसीबीच्या कटरने पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या