उज्जैन | Ujjain
गेल्या काही महिन्यांपासून देशात महिलावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीसोबत घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे.
तर दुसरीकडे बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. अशातच मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात एक संतापजनक घटना घडली आहे.
उज्जैनमधील कोयला फाटक चौक परिसरात फुटपाथवर दिवसाढवळ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. आरोपीनं महिलेला दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला.
हे ही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
दरम्यान, तो इसम महिलेबरोबर दुष्कर्म करत असताना त्या फुटपाथवरून लोक ये-जा करत होते. मात्र हे पादचारी महिलेला वाचवण्याऐवजी अत्याचाराचा व्हिडीओ चित्रीत करत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिलेने सांगितले की, तरुण दारुच्या दुकानाजवळ भेटला होता. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि धमकी देऊन पळून गेला. महिलेचा जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
हे ही वाचा : लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून तरुणाला मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी २ ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ४५ वर्षांची असून ती कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्याचं काम करते. कोयला फाटक परिसरात ती प्लास्टिक वेचत होती. तेव्हा आरोपी लोकेशनं तिला बोलण्यात गुंतवलं. तिचा विश्वास संपादन करत दारु पाजली. लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार आरोप करण्यास सुरुवात केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा : लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले