Prayagraj उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांमधील एक असून सध्या प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून झाली आहे. प्रयागराज मधील मधील महाकुंभ मेळ्याची सुरुवात उद्या १३ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे.
आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी कुंभमेळाव्याचे आयोजन केले जाते.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याची पहिली पर्वणी उद्या दिनांक १३ जानेवारी २०२५ असून शेवटची पर्वणी दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी असणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे.या महा कुंभामध्ये देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.
प्रयागराज मधील महाकुंभमेळा – 2025 मधील शाहीस्नानाचे दिवस कोणते?
पौष पौर्णिमा स्नान – 13 जानेवारी 2025
मकर संक्रांती स्नान – 14 जानेवारी 2025
मौनी अमावस्या स्नान – 29 जानेवारी 2025
बसंत पंचमी स्नान – 3 फेब्रुवारी 2025
माघी पौर्णीमा स्नान – 12 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्र स्नान – 26 फेब्रुवारी 2025