Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMahadev Jankar: पृथ्वीराज चव्हाणांनंतर आता महादेव जानकरांचा गोपिनाथ मुंडेंबाबत गौप्यस्फोट, म्हणाले भाजपच्या...

Mahadev Jankar: पृथ्वीराज चव्हाणांनंतर आता महादेव जानकरांचा गोपिनाथ मुंडेंबाबत गौप्यस्फोट, म्हणाले भाजपच्या…

बीड | Beed
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा चर्चेत आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांनी मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते, असा दावा केल्यानंतर हे प्रकरण तापताना दिसत असून, चव्हाणांनंतर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे हे भाजपच्या (BJP) जाचाला कंटाळले होते आणि काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू होता, असे जानकर यांनी म्हंटले आहे.

महादेव जानकर नेमंक काय म्हणाले?
एखादा व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर ही गोष्ट आपण बोलणं बरोबर नाही. पृथ्वीराज चव्हाण ही चांगली व्यक्ती आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, ते मोठे नेते आहेत. पण आज मुंडे साहेब हयात नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आता बोलणं योग्य नाहीये, एवढंच मला म्हणायचं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे मलाही नक्की माहिती नाही, परंतु त्यावेळी भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार गोपीनाथ मुंडे यांचा सुरू होता. परंतु काय घडलं हे नक्की मला सांगता येणार नाही, कारण मी त्या बैठकीला नव्हतो. मात्र एक गोष्ट नक्की की मुंडे साहेब हे भाजपच्या जाचाला कंटाळे होते, असं यावेळी महादेव जाणकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संपादकीय : १७ ऑगस्ट २०२६ – वैयक्तिक स्वातंत्र्यावर न्यायालयाचा आरसा

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडे केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा या प्रवेशाला विरोध असल्यामुळे हा निर्णय पुढे जाऊ शकला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले होते.

ताज्या बातम्या

Akole : मुळा नदीपात्रातील मोटारींच्या केबल चोरीचा पर्दाफाश

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील कोतूळ व पिंपळगाव खांड परिसरातील मुळा नदीपात्रात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरी करणार्‍या टोळीचा अकोले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...