Thursday, October 1, 2026
HomeनगरAkole : मुळा नदीपात्रातील मोटारींच्या केबल चोरीचा पर्दाफाश

Akole : मुळा नदीपात्रातील मोटारींच्या केबल चोरीचा पर्दाफाश

आठ आरोपी गजाआड || 2 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कोतूळ व पिंपळगाव खांड परिसरातील मुळा नदीपात्रात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरी करणार्‍या टोळीचा अकोले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ आरोपींना अटक करून सुमारे 2 लाख 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोतूळ येथील शेतकरी दीपक गंगाधर देशमुख यांनी 17 ऑगस्ट रोजी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोतूळ शिवारातील पळसुंदे येथील मुळा नदीपात्रातून स्वतःसह इतर शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारींच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण रामभाऊ मधे (21, रा. पांगरी, ता. अकोले), किरण संतोष मधे (24, रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर), साहिल बुधा गिर्‍हे (22, रा. एकलव्य नगर, नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) आणि अविनाश कैलास मधे (22, रा. एकलव्य नगर, नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरी केलेल्या केबलमधील तांब्याच्या तारा काढून त्या राजेंद्र सोमनाथ वर्पे (31, रा. वरवंडी, ता. संगमनेर) याला दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वर्पे याची चौकशी केली असता त्याने तांब्याच्या तारा गुलाम रसूल इसाक शहा (43, रा. आश्वी, ता. संगमनेर) याला विकल्याचे कबूल केले. पुढील तपासात शहा याने हा मुद्देमाल अब्बास सुभान तांबोळी (66, रा. चितळी रोड, राहाता) आणि प्रशांत रामदास डमाळे (43, रा. लोणी, ता. राहाता) यांना विकल्याचे सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल, 1 लाख 50 हजार रुपये किमतीची कार (एमएच 43, एक्स 6507) तसेच चोरीच्या केबलमधील सुमारे 26 किलो व 46 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा असा एकूण 2 लाख 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोहेकॉ. अनिल जाधव, पोकॉ. विजय फटांगरे, महेंद्र गुंजाळ, सुहास गोरे, अविनाश गोडगे, योगेश जोरगील, मंगेश बिडवे, मच्छिद्र इंगळे, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील सायबर सेलचे पोहेकॉ. सचिन धनाड व वेताळ यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...