Tuesday, December 3, 2024
Homeनगरशेवगाव-पाथर्डीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव पडणार?

शेवगाव-पाथर्डीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव पडणार?

अहिल्यानगर/शेवगाव । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहिले चार दिवस संपले आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढत असताना मराठवाड्याला खेटून असणार्‍या या मतदारसंघात मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा प्रभाव पडणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. तसे झाल्यास शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव-पाथर्डी या दोन तालुक्यांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्याची चुणूक पहिल्या चार दिवसांत आली असून आता या काळात अपक्षांसह लहान-मोठ्या पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले असून यातील काहींचे अर्ज दाखल झाले आहेत. तर काहींचे अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याचा विस्तार आणि जातनिहाय मतदार संख्या पाहिल्यास याठिकाणी त्याचा यापूर्वी प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात या विधानसभा मतदारसंघात जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा फारसा प्रभाव दिसला नसला तरी यंदा विधानसभा निवडणुकीच्या सुरूवापासून या विषयावर या दोन्ही तालुक्यांत चर्चा होताना दिसत आहे. होणारी चर्चा केवळ चर्चा राहणार की तिचे मतदानात परिवर्तन होणार यासाठी 23 नोव्हेंंबरची वाटप पाहवी लागणार आहे. या दोनही तालुक्यात काही उमेदवारी जरांगे यांच्या आरक्षणाच्या मुद्यावर स्वार होण्याचा तर सत्ताधारी उमेदवारी कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत.

मात्र, असे असले तरी मतदारसंघात सध्या जरांगे यांच्या भूमिकेवर जोरदार चर्चा आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी जरांगे फॅक्टर कितपत प्रभावी ठरणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. दरम्यान, निवडणुकीत वाढलेल्या उमेदवारांची संख्याही महायुतीसह महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी वाढणारी ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या