Saturday, June 20, 2026
Homeनगरआज संगमनेर येथे रंगणार सार्वमत कृषी आयकॉन सोहळा

आज संगमनेर येथे रंगणार सार्वमत कृषी आयकॉन सोहळा

कृषी क्षेत्रातील शेतकरी, संशोधक, उद्योजकांचा सन्मान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अहिल्यानगर जिल्ह्याचे मुखपत्र दैनिक सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीनिमित्त कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात ठळक कामगिरी नोंदविणार्‍या प्रगतशील शेतकरी, संशोधक आणि कृषी उद्योजकांचा सन्मान ‘सार्वमत कृषी आयकॉन’ पुरस्काराने होत आहे. आज शुक्रवारी रंगणार्‍या या सोहळ्यात जिल्ह्यातील 30 मान्यवरांचा सन्मान होत आहे.

- Advertisement -

नुकतेच सार्वमतने स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. याअंतर्गत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संगमनेरमधील वसंत लॉन्स् येथे हा समारंभ होत आहे. 50 वर्षाच्या वाटचालीत सार्वमतने भूमिपुत्रांचे दैनिक म्हणून आपली ओळख दृढ केली. जिल्ह्यातील शेती, सिंचन, सहकार यासह कृषी विकासाच्या प्रत्येक चळवळीत ‘सार्वमत’ आपल्या लेखणीने सक्रीय राहिला. कृषी विकासासाठी शेतकर्‍यांना सजग करण्यासोबत बदलांचा अचूक वेध घेणारी पत्रकारिता राबविली.

जिल्ह्यात अनेकजण आपल्या कार्यक्षेत्रातून कृषी विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांचे कार्य येथील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिशा देणार आहे. अशाच 30 जणांचा सन्मान सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे व नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष काटकर या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सन्मानार्थींमध्ये प्रगतशील शेतकरी, कृषी संशोधक, कृषी उद्योजकांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Nashik NCP News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार –...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार,...