Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSudhir Mungantiwar: "इकडे मराठी अभिजात करायची आणि…"; विधानसभेत मुनगंटीवारांकडून भाषेचा मुद्दा उपस्थित

Sudhir Mungantiwar: “इकडे मराठी अभिजात करायची आणि…”; विधानसभेत मुनगंटीवारांकडून भाषेचा मुद्दा उपस्थित

मुंबई | Mumbai
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज गुरुवारी (दि.२ जुलै) चौथा दिवस आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची आज पुन्हा विधानसभेत आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. त्यांनी विधानसभेतील इंग्रजी कामकाज पत्रिकेवर जोरदार आक्षेप घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? असा सवाल त्यांनी केला.

नेमके काय घडले?
विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुनगंटीवारांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना इंग्रजीतील कार्यक्रम पत्रिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना समजावून सांगत अशा प्रकारची मागणी सभागृहातील ८ सदस्यांकडून आल्याचे नमूद केले व मुनगंटीवारांची मागणी फेटाळून लावली.

- Advertisement -

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
”मी कधीही इंग्रजीमधून कार्यक्रम पत्रिका पाहिली नाही. इकडे मराठी अभिजात करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी…! मग त्यांनी हिंदीत बोलावे. कार्यक्रम पत्रिकाच हिंदीत घ्यावी. हिंदीचा सक्तीचा विरोध करायचा आणि इंग्रजीच्या सक्तीवर प्रेम दाखवायचे. इंग्रजीला अलिंगन द्यायचे. यासाठी नियम समितीची बैठक घ्यावी. इंग्रजीत शब्द जिथे जिथे असतील तर काढून टाका. मराठी शिकलीच पाहिजे. समजा एखाद्याला अडचण असेल तर हिंदी. त्यांना खूपच इंग्रजीशिवाय समजत नसेल तर डायरेक्ट व्हिसा, पासपोर्ट काढून ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा,” असे मुनगंटीवार सभागृहात म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मिश्किल टिप्पणी केली. “सुधीरभाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठीबद्दल लिहायला खूप काही आहे. आता तुम्ही त्यात इंग्रजीची भर घालू नका”, असे त्यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

“नियम २२ नुसार सभागृहात कोणत्या भाषेत चर्चा करता येते हे सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे आपण सुरुवातीपासून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये कामकाज पत्रिका तयार करतो. त्याशिवाय माझ्याकडे कामकाज पत्रिका इंग्रजीत देण्यात यावी अशी ९ सदस्यांची विनंतीही आली आहे”, असे उत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पश्चिम

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर; मोदींनी झालमुरी खालेल्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील २९३ जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीला सुरवात झाली असून या ठिकाणी चुरशीची लढत होताना दिसत आहे. ताज्या...