Tuesday, October 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात महाराष्ट्रात गुंतवणुक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

कौशल्य, भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारी सक्षम औद्योगिक परिसंस्था, कुशल मनुष्यबळ आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण यामुळे महाराष्ट्र जागतिक उद्योगांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यामुळे युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील भागीदारी केवळ सामंजस्य करारांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यवसाय, उद्योग आणि रोजगारनिर्मितीतून पुढे गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. तर पुणे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्यातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या कंपन्यांचे जाळे ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची संधी मिळाली आहे. ब्रिस्टल, यॉर्क आणि ॲबर्डिन यांसारखी जागतिक विद्यापीठे राज्यात येत आहेत. याशिवाय, एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीच्या माध्यमातून संशोधन, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या संस्था आणि प्रतिभेला एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठ्या संधी
औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण अशा क्षेत्रांत महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांनी राज्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे उभारावीत, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासह केवायसी प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष सहाय्य विभागाच्या...