Tuesday, October 13, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता बाजार समिती 1259 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 3500 ते 4800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2200 ते 3450 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 3200 रुपये. जोड कांदा (Onion) 700 ते 1400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 3509 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 201 ते 305 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. संत्रीच्या 41 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 28 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 11 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 15 ते 105 रुपये तर सरासरी 75 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सोयाबीन ची 9 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला 6600 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासह केवायसी प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष सहाय्य विभागाच्या...