Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Cabinet Decision : अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा; राज्य मंत्रिमंडळ...

Maharashtra Cabinet Decision : अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई । Mumbai

आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि लोकभावनेचा आदर करत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना आता थेट सभागृहात मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने थेट आर्थिक लाभाच्या घोषणांवर मर्यादा आहेत. मात्र, प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांवर भर देत सरकारने आपले महत्त्वाचे पत्ते टाकले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  1. ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)
  2. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
  3. धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)
  4. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...