Tuesday, March 25, 2025
HomeनंदुरबारMaharashtra Cabinet Expansion: आ. गिरीश महाजन यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion: आ. गिरीश महाजन यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात गिरीश महाजन यांनी देखील तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. गिरीश महाजन यांचा राजकारणात प्रवेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून झाला. त्यांनी १९८१ ते १९८३ या काळात जनरल सेक्रेटरी (जी. एस.), आर्ट्स, सायन्स व वाणिज्य महाविद्यालय, जामनेर (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) येथे पद भूषविले होते.

- Advertisement -

त्यानंतर त्यांनी १९८८ ते १९९० या काळात भारतीय जनता युवा मोर्चा, जामनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पहिले. त्यानंतर १९९० ते १९९३ या काळत तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका हे पद भूषविले. तर
१९९२ साली ते जामनेर ग्रामपंचायतचे सरपंच झाले. त्यानंतर १९९३ ते १९९५ या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले

यानंतर १९९५ ते १९९९ या काळात ते जामनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

१९८१ ते १९८३ – जनरल सेक्रेटरी (जी. एस.), आर्ट्स, सायन्स व वाणिज्य महाविद्यालय, जामनेर (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद)

१९८८ ते १९९० – तालुकाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, जामनेर तालुका

१९९० ते १९९३ – तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका

१९९२ – सरपंच, जामनेर ग्रामपंचायत

१९९३ ते १९९५ – जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव जिल्हा

१९९५ ते १९९९ – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (पहिली टर्म)

१९९५ ते १९९७ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

१९९९ ते २००४ – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (दुसरी टर्म)

२००३ ते २००५ – प्रदेश सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

२००४ ते २००९ – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (तिसरी टर्म)

२००६ ते २००९ – जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा

२००८ – प्रतोद, भारतीय जनता पार्टी, विधानसभा, महाराष्ट्र

२००९ ते २०१४ – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (चौथी टर्म)

२०११ ते २०१४ – प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

२००१४ ते २०१९ – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (पाचवी टर्म)

२०१४ ते २०१९ – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
२०१४ ते २०१९ – जलसंपदा
२०१४ ते २०१९ – खारभूमी व लाभक्षेत्र विकास विकास
२०१६ ते २०१९ – वैद्यकीय शिक्षण
२०१६ – कौशल्य विकास आणि उद्योजकता (अतिरिक्त प्रभार)

२०१४ ते २०१९ – पालकमंत्री, नाशिक जिल्हा
२०१४ ते २०१९ – पालकमंत्री, नंदुरबार जिल्हा
२०१९ – पालकमंत्री, जळगाव जिल्हा

२०१९ ते आजपर्यंत – आमदार, जामनेर विधानसभा, महाराष्ट्र (सहावी टर्म)

२०२२ ते आजपर्यंत – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
२०२२ ते आजपर्यंत – ग्रामविकास व पंचायती राज
२०२३ ते आजपर्यंत – पर्यटन
२०२२ ते २०२३ – वैद्यकीय शिक्षण
२०२२ ते २०२३ – क्रीडा व युवक कल्याण

२०२२ ते आजपर्यंत – पालकमंत्री, धुळे जिल्हा
२०२२ ते आजपर्यंत – पालकमंत्री, नांदेड जिल्हा
२०२२ ते आजपर्यंत – पालकमंत्री, लातूर जिल्हा

तसेच १९९५ ते १९९७ या काळात त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेशचे कामकाज बघितले. तर १९९९ ते २००४ या काळात ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ ते २००९ या काळात तिसऱ्यांदा तर २००९ ते २०१४ या कालावधीत चौथ्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ ते २०१९ पाचव्यांदा आणि २०२४ मध्ये ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

तर महाजन यांनी २०१४ ते २०१९ या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असून त्यात त्यांनी जलसंपदा, खारभूमी व लाभक्षेत्र विकास विकास, वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता (अतिरिक्त प्रभार) या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. तर २०१४ ते २०१९ या काळात नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...