Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Drought : राज्यातील ७५ टक्के भागात दुष्काळ; तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा...

Maharashtra Drought : राज्यातील ७५ टक्के भागात दुष्काळ; तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश?

मुंबई | Mumbai

राज्यात पावसाच्या (Rain) मोठ्या ओढीमुळे निर्माण झालेल्या गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या खरीप हंगामात पर्जन्याची तूट आणि इतर घटकांमुळे प्रभावित झालेल्या राज्यातील ३६ जिल्ह्यांतील (District) एकूण ३५८ तालुक्यांपैकी ७५ टक्के भागात प्रथम कळ (Trigger-1) अंतर्गत दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

- Advertisement -

मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून जिल्हाधिकाऱ्यांना बाधित क्षेत्रांत तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वतः दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील टंचाईग्रस्त भागाचा दौरा करून थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला होता.

हे देखील वाचा : Maharashtra Drought : अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; CM फडणवीसांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘या’ सवलतींची घोषणा

दरम्यान, आज (शनिवारी) राज्य सरकारकडून (State Government) राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.दुष्काळ जाहीर झाल्यामुळे बाधित तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने काही सवलती देखील लागू केल्या आहेत.

पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिपीएस कोऑर्डिनेट (GPS Coordinate) आणि छायाचित्रांसह शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत देण्याबाबत स्वतंत्र शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Drought : नाशिक महसूल विभागातील ४९ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यातील कुठल्या भागाचा समावेश?

जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुक्यांची संपूर्ण यादी (एकूण २६५ तालुके)

कोकण विभाग

ठाणे : निरंक (०)
पालघर : निरंक (०)
रायगड (१) : श्रीवर्धन
रत्नागिरी (३) : रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग (८) : सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला

नाशिक विभाग

नाशिक (१०) : मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे (४) : धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर
जळगाव (१५) : एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार (६) : अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर (१४) : नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता

पुणे विभाग

पुणे (८) : भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर (११) : उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली (४) : मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ
सातारा (६) : सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर (६) : पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग

छत्रपती संभाजीनगर (९) : छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना (८) : बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड (११) : बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर (१०) : लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
नांदेड (१४) : नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
परभणी (९) : पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली (५) : हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

अमरावती विभाग

बुलढाणा (१३) : जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती (१४) : अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर
अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
वाशीम (६) : वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ (१६) : यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव

नागपूर विभाग

वर्धा (७) : वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
नागपूर (१४) : नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा (३) : भंडारा, पवनी, लाखंदूर
गोंदिया (१) : तिरोडा
चंद्रपूर (१२) : चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूळ, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा
गडचिरोली (२) : गडचिरोली, चामॉर्शी

ताज्या बातम्या

अहिल्यानगर हादरले! विळद घाटातील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात पहाटे रक्तरंजित थरार; २ वृद्धांचा...

0
अहिल्यानगर । Ahilyanagar विळद घाट परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात पहाटेच्या सुमारास घडलेल्या गंभीर घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा...