Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रविकेंड लाॅकडाऊनबाबत स्पष्टता ; काय सुरु, काय बंद?

विकेंड लाॅकडाऊनबाबत स्पष्टता ; काय सुरु, काय बंद?

मुंबई (प्रतिनिधी) –
कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी लागू केलेल्या विकेंड लाॅकडाऊनसाठी जनतेत संम्रभ राहू नये म्हणून सरकारच्या

आपत्ती निवारण विभागाने शुक्रवारी नियमावली जाहीर केली. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार असे आठवड्यातले दोन दिवस राज्यात पूर्ण लाॅकडाऊन असणार आहे.

- Advertisement -

या काळात सकाळी सात ते सायंकाळी आठवाजेपर्यत जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत असणारे माॅल, सुपर मार्केट, डि मार्ट, रिलायन्स मार्ट, बीग बझार आदी खुली राहतील. जीवनावश्यक वस्तू खरेदीशिवाय कोणत्याही नागरिकाला योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

कृषी उत्पन्न बाजार समित्या चालू राहतील. स्थानिक प्रशासन त्यावर देखरेख करेल. बांधकामाचे साहित्य पुरवणारी दुकाने बंद राहतील. दळणवळण संदर्भातील दुरुस्ती सेंटर, गॅरेज आदी आवश्यकता खुली राहतील. मात्र अॅटो पार्ट विक्री दुकाने बंद राहतील.

अत्यावश्यक सेवेत काम करत असलेले कर्मचारी-अधिकारी वगळता सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) कर्मचारी- आधिकारी यांच्या हालचालीवर या दोन दिवसाच्या काळात निर्बंध असतील. दारूची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र बारमधून नागरिकांना दारू पार्सलच्या स्वरूपात मागवता येऊ शकेल.

रस्त्याच्या कडेचे ढाबे, हाॅटेल सुरू राहतील. पण येथे केवळ पार्सल सेवा उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक उपकरणाची दुकाने, इलेक्ट्रॉनीक दुकाने, कंप्युटर विक्री दुकाने बंद राहतील. आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, प्रसिद्धी माध्यमांची कार्यालये, पासपोर्ट सेवा केंद्र आदी सरकारी सेवा देणारी कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहतील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून एक कोटींचा गंडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कंपनीच्या डिव्हीजन प्रेसिडेंट नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून कंपनीच्या एचआर मॅनेजर आणि वरिष्ठ लेखापालाला एक कोटी रुपये पाठविण्यास भाग पाडल्याचा...