Thursday, March 13, 2025
Homeनगरनगरमध्ये आज ठरणार ‘महाराष्ट्र केसरी’

नगरमध्ये आज ठरणार ‘महाराष्ट्र केसरी’

माती विभागात गायकवाड-यादव तर गादी विभागात मोहोळ-राक्षे यांच्यात अंतिम लढत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरूध्द पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार आहे. तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरूद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे. या लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज (रविवारी) सामना होणार आहे. दरम्यान, शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरूद्ध साकेत यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार हे आजच्या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी, दोघेही मल्ल हे पुणे जिल्ह्यातील आहेत. यामुळे कोणता पुणेकर गादी विभागातील विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक तूल्यबळ लढती पाहावयास मिळाल्या. माती विभागातील पहिली सेमीफायनल सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड विरूध्द सोलापूर जिल्ह्याचाच विशाल बनकर यांच्यात शेवटपर्यंत रंगली. महेंद्रने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत गुण मिळवले. विशालने अनेकवेळा महेंद्रवर चाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेंद्रने अखेर 4-1 असा विशालचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरी सेमीफायनल परभणीचा साकेत यादव विरूध्द गोंदियाचा सुहास गोदे अशी रंगली. साकेतने वर्चस्व राखत सुहासचा 4-2 असा पराभव केला. मातीतील अंतिम लढत साकेत यादव विरुध्द महेंद्र गायकवाड यांच्यात रंगणार आहे.

गादी विभागातील पहिली सेमीफायनल मुंबई उपनगरचा सतपाल शिंदे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. यामध्ये 10-0 असा पृथ्वीराजने विजय मिळवत गादी विभागातील अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश मिळवला. तर दुसरी सेमीफायनल नांदेडचा शिवराज राक्षे विरूध्द अहिल्यानगरचा चेतन रेपाळे अशी रंगली. शिवराजने एकतर्फी 10-0 असा विजय मिळवला. शिवराजने अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी दुसरी लढत सोलापूर शहरचा वेताळ शेळके आणि सोलापूर जिल्ह्याचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची झाली. शेवटच्या मिनिटांपर्यत वेताळ गुणाने पुढे होता. पहिल्या हाफमध्ये विशालला एकही गुण मिळवता आला नाही.

मात्र, वेताळने 5 गुणांची आघाडी घेतली. विशालने नंतर 2 गुणांची कमाई केली. शेवटच्या मिनिट शिल्लक असताना विशालने वेताळला चितपट करत अस्मान दाखवले. तिसरी लढत परभणीचा साकेत यादव विरूध्द भंडार्‍याचा विक्रमसिंह भोसले यांच्यातील लढत एकतर्फी झाली. साकेतने विक्रमसिंहचा 10- 0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथा सामना गोंदियाचा सुहास गोडगे विरूध्द पुणे जिल्ह्याचा आकाश रानवडे यांच्यातील लढतही एकतर्फी झाली. सुहासने 5-0 असा आकाशचा पराभव केला. गादी विभागातील उपांत्यचा पहिला सामना मुंबई उपनगरचा सतपाल शिंदे विरूध्द गोंदियाचा सतीश मुंढे यांच्यात लढत झाली. यात सतपालने विजय मिळवत सेमीफायनलमध्ये दाखल झाला. दुसरी लढत नंदुरबारचा धनाजी कोळी आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली. सुरूवातीलाच दमदार पकड आणि एकेरी पट काढत 6 गुणांची आघाडी पृथ्वीराजने घेतली. 10-0 असा पृथ्वीराजने धनाजीचा पराभव केला.

सुदर्शन कोतकर जखमी
चौथी लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि अहिल्यानगरचाच सुदर्शन कोतकर यांच्यात झाली. ही लढतही रंगतदार ठरली. सुरुवातीच्या पहिल्याच मिनिटात सुदर्शनला चितपट करत दावेदारी सिध्द केली. यजमान अहिल्यानगरच्या कोतकरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु तो जखमी झाल्याने स्पर्धेबाहेर फेकला गेला. दुसर्‍या चेतनचाही पराभव झाल्याने नगरकरांचे स्वप्न भंगले.

उत्कंठावर्धक लढतींनी मने जिंकली
स्पर्धेत महाराष्ट्र केसरी (86 ते 125) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...