Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर;...

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर; ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं? वाचा A to Z रिपोर्ट

मुंबई | Mumbai

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दि. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जात असतान विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. यानंतर अनेकांनी विमान दुर्घटनेवर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घातपात? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली होती. यानंतर आता अजित पवारांचा अपघात कसा झाला? याबाबतचा २२ पानी चौकशी अहवाल समोर आला आहे.

- Advertisement -

या अहवालानुसार, अजित पवारांच्या अपघातावेळी दोन हजार इतकी दृश्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकेच्या कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून एक टीम भारतात येणार आहे.तसेच अपघातमुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि एफडीआर डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे . ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अपघात घडण्यामागचे नेमके कारण काय?

मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन-शेड्युल्ड/VIP फ्लाइटने रनवे ११ वर लँडिंगचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात ‘Go-Around’ करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” कळवले. मात्र एटीएसने तीन किमी दृश्यमानता नोंदवली, जी VFR (Visual Flight Rules) अंतर्गत आवश्यक पाच किमीपेक्षा कमी होती. लँडिंग क्लिअरन्सनंतर काही क्षणांत विमान रनवेच्या डावीकडे सुमारे ५० मीटर अंतरावर झाडांवर आदळले आणि त्यानंतर आग लागून पूर्णतः नष्ट झाले, असं या अहवालात नमूद आहे.

अपघात घडण्यापूर्वी शेवटचं संभाषण काय झालं होतं?

या अहवालात अजित पवारांचे निधनापूर्वी काय संभाषण झालं होतं त्याची माहिती देण्यात आली आहे. ८ वाजून २९ मिनिटं, २५ सेंकद इथपासून ते ८ वाजून ४६ मिनिट आणि १३ सेंकदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची सेकंदा -सेकंदाची माहिती या अहवामामध्ये नमूद करण्यात आली आहे. शेवटचा सवांद हा ८ वाजून ४६ मिनिट आणि १३ सेंकदाने झाला, ज्यामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हणत आहे, मात्र त्याला त्यानंतर बारामती एटीसीकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नव्हते.

अहवालात नेमकं काय?

  • अजित दादांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आला असून या अहवालात अपघाताच्या कारणांबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. एकूण २२ पानांचा हा अहवाल संबंधित तपास यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • अहवालानुसार, विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमीनीवर खाली कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती, असे नमूद करण्यात आले आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) उष्णतेमुळे खराब झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • मात्र उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सदर अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अंतिम निष्कर्षांसाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...