मुंबई | वृत्तसंस्था Mumbai
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत देव आनंद यांचे पुत्र आणि अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुनील आनंद यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे वडील देव आनंद यांनी केले होते. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काहीसे अंतर राखले.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. देव आनंद यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला असून, सुनील आनंद यांच्या स्मृतींना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.




