Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAcharya Devvrat : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

Acharya Devvrat : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई | Mumbai

सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांच्याकडे महाराष्ट्राच्या (Maharashtra) अतिरिक्त राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर आज गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे देवव्रत यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.

दरम्यान, आचार्य देवव्रत त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांच्यासह काल (रविवारी) सकाळी अहमदाबादहून तेजस एक्सप्रेस ट्रेनने मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

ताज्या बातम्या

Crime News : बनावट सह्या करून 88 लाखांचे कर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भागीदारी संस्थेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून एका व्यावसायिकाला भागीदार दाखवत त्याच्या नावाचा वापर करून 88 लाख रूपयांचे वाहन कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार...