Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBacchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी कडूंचा 'प्रहार'; सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

Bacchu Kadu : शेतकरी कर्जमाफीसाठी कडूंचा ‘प्रहार’; सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर | Nagpur

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) कर्जमाफीसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडूंनी नागपूर-वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कडू यांनी म्हटले आहे. यानंतर आता सरकारने मध्यस्थी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांनी सरकारला दुपारी बारा वाजेपर्यंत चर्चेसाठीचा अल्टिमेटम देत रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

बच्चू कडू यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखून धरला असून, जोपर्यंत कर्जमाफीचा (Farmer Loan Waiver) ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच आमची चर्चेसाठी तयारी असून आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही सरकारची वाट पाहू अन्यथा रेल्वे रोखून दाखवू असा आक्रमक पवित्रा घेत बच्चू कडू यांनी घेतला आहे. कडू यांच्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर, रविकांत तुपकर, अजित नवले देखील सहभागी झाले आहेत.

बच्चू कडूंच्या मागण्या नेमक्या काय?

बच्चू कडू यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये “कोणत्याही अटीशर्ती शिवाय शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, ऊसाला यंदा प्रति टन ४३०० रुपये एफआरपी द्या, कांद्याला किमान प्रति किलो चाळीस रुपये भाव द्या, कांद्यावरची निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य, निर्यात कर, हे कायमचे बंद करा, गाईच्या दुधाला किमान ५० तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या, अशा मागण्यांचा समावेश आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) केल्याने आंदोलकांनी नागपूर -वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहेत.तसेच कडूंच्या या आंदोलनामुळे फक्त नागपूर -वर्धा महामार्गावर कोंडी झालेली नाही तर एका बाजूला नागपूर-अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर -रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर कित्येक किलोमीटरपर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात;...

0
मुंबई | Mumbai गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री...