Saturday, April 4, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला; राज्यभरात...

Maharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या ‘त्या’ विधानावरून वाद पेटला; राज्यभरात भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन

तर पुण्यात दगडफेक

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतानची (Tipu Sultan) तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध करण्यात येत असून, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. तर या आंदोलनाला पुण्यात गालबोट लागले असून, भाजप आणि काँग्रेसच्या (Congress and BJP) कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह इतर ठिकाणी भाजपकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तर पुण्यातील काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्त्यांकडून सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन (Protest) केले जात असताना दगडफेक झाल्याने एका महिला पोलीस कर्मचार्‍यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे डोके फुटले आहे. तसेच कारच्या देखील काचा फुटल्या आहेत. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्ही दगडफेक केली नसल्याचे म्हटले आहे. उलट दगड मारण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच सुरुवात केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik BJP News : आमदार फरांदेंच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस कमिटीसमोर आंदोलन; ‘त्या’ विधानावरून हर्षवर्धन सपकाळांना दिला इशारा

तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने स्वताच्या डोक्यात दगड मारून घेतला असावा असे म्हटले आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक (Arrested) करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीसांकडून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. पुण्यात काँग्रेस भवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असताना हल्ला झाल्याने पोलीसांनी भाजपला अभय दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...