Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

Maharashtra News : पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का

एसटीच्या अध्यक्षपदाबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या (Nashik and Raigad Districts) पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी (दि.०५) रोजी १७ जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केल्याचे भाजपने (BJP) म्हटले असले तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जात आहे.त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांना मोठा धक्का दिला आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी (Sanjeev Sethi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाकडून राजपत्र जारी करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडे असायचे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात नियमात बदल करुन भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का बसला आहे. सरनाईकांना परिवहन खात्याबरोबरच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देखील हवे होते, असे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद (Chairmanship of ST Corporation) शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करुन एसटीचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आताच्या सरकारमध्ये एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी परिवहन मंत्री या नात्याने प्रताप सरनाईक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता एसटी महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...