Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचे चार...

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचे चार मोठे निर्णय

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस भरतीसह चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल १५ हजार पोलीसपदांच्या नवीन भरतीला राज्य सरकारने (State Government) मंजुरी दिली आहे. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि समान्य प्रशासन विभागासाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे

गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी

अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय सामाजिक

न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...