Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात घेतलं विष; वाल्मिक कराडचे...

Maharashtra News : भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात घेतलं विष; वाल्मिक कराडचे नाव घेत म्हणाले….

मुंबई | Mumbai

नवी मुंबई (New Mumbai) शहरातील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यात (Police Station) विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर विष प्राशन केल होते. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. तर जाधव यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी विष प्राशन करण्याआधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे (Suicide News) टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, विष प्राशन केल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात ( Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

भरत जाधव यांनी व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

मी आज मानसिक तणावात पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चाललीय की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. इतर राजकारण्यांप्रमाणे २५ वर्षांच्या राजकारणात मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. कर्जत-जामखेड तालुक्यात चार-पाच वर्षांपूर्वी बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, ३० ते ४० पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही.

आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे. भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी ९० लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत ६० लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमची काहीही चूक नसताना आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत असल्याचं भरत जाधव यांनी म्हटले आहे.

जामखेडमध्ये मी कोट्यवधी रूपये लावून जमीन घेतली यामध्ये अनेकांना कमिशन घेतलं. दत्ता पवार आणि रूपेश पवार यांनी रस्ता काढून देण्यासाठी पाच-सात लाख घेतले. आता माझ्या जमिनीकडे जाणारा रस्ता खोदलाय. जेणेकरून मला जमीन विकता येऊ नये. नवी मुंबईमध्ये मी ज्याला लहानाचा मोठा केला, कामं घेऊन पैसे दिले. नरेंद्र झुराणी याला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रूपये घेत भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव केले. दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते. बदनामी करायला, टार्गेट करायला मर्यादा असते. विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात, त्रास देतात. त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही. झुरानी यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी, असे भरत जाधव आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...