Thursday, July 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : मंत्री नितेश राणे यांना मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जामीन...

Maharashtra News : मंत्री नितेश राणे यांना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात जामीन मंजूर

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत बदनामीकारक विधान करणारे भाजप आमदार तथा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने (Court) मोठा दिलासा दिला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राणे यांच्या विरोधात जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द करत उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी दिली. तसेच राणे हे सध्या कोकणात असल्याने सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने जारी केले.

- Advertisement -

महाराष्ट्रात (Maharashtra) झालेल्या सत्तांतर नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी माध्यमांसमोर केलं होतं. मे २०२३ दरम्यान केलेल्या वक्तव्यात नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा ‘साप’ म्हणून उल्लेख केला होता. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नितेश राणेंविरोधात माझगाव न्यायालयात (Mazgaon Court) अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

यापूर्वीही खटल्याच्या सुनावणीसाठी नितेश राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. गेल्या काही सुनावणीत नितेश राणे हे न्यायालयात (Court) उपस्थित राहिले नव्हते, याची दखल घेत माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी १६ मेच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या नावानं जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

आज सुनावणी दरम्यान न्यायालयाने राणे यांना दिलासा देताना वॉरंट रद्द केला. तसेच न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी देताना राणे हे सध्या कोकणात असल्याने सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात (Sindhudurg Police Station) २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने जारी केले.

ताज्या बातम्या

Nashik News : रामकुंड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोघांची थरारक सुटका

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati गोदावरी नदीला (Godavari River) आलेल्या पुरामुळे रामकुंड येथील गांधी तलाव परिसरात अडकलेल्या दोन जणांची स्थानिक जीवरक्षक दल, पंचवटी विभागीय अग्निशमन...