Tuesday, May 5, 2026
Homeमुख्य बातम्याMLA Sanjay Gaikwad : आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिलं; संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला...

MLA Sanjay Gaikwad : आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिलं; संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला चोपलं, Video व्हायरल  

मुंबई | Mumbai

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या कारणावरून हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण (Beating) केली आहे. त्यांच्या या मारहाणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील (MLA Residence) कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. मात्र, त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. या डाळीची दुर्गंधी पाहून आमदार गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितले. तसेच बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या गोंधळाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

… अन् टॉवेल आणि बनियनवरच कॅन्टीनमध्ये पोहोचले

आमदार निवासात राहत असलेले शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांना जेवणाचा दर्जा खराब वाटल्याने ते चांगलेच संतापले. यावेळी रागाच्या भरात ते टॉवेल आणि बनियान घालून थेट कॅन्टीनमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला भाजीचा वास घेण्यास सांगितला आणि खराब जेवण देण्याचा जाब विचारत कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावेळी त्यांचा काही लोकांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला.

आमदार गायकवाड कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर काय म्हणाले?

आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवले होते. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक या ठिकाणी येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देत असतील तर मग सामान्य माणसांचे काय होत असेल? असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...