Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGirish Mahajan : मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; महिलेने मंत्री महाजनांना सुनावलं,...

Girish Mahajan : मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; महिलेने मंत्री महाजनांना सुनावलं, नेमकं काय म्हणाली?

मुंबई | Mumbai

लोकसभेत (Loksabha) महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यातील भाजप (BJP) महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.त्याच पार्श्वभूमीवर काल (मंगळवार) मुंबईतील वरळी डोम येथे भाजप महायुतीच्यावतीने जनआक्रोश महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या संमलेनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेने चक्क मंत्री गिरीश महाजन यांनाच सुनावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महायुतीमधील शिवसेना महिला आघाडी आजच्या महायुती मोर्चाला अनुपस्थित होती, पक्षाकडून आदेश नसल्याने मोर्चला अनुपस्थित असल्याचे महिला आघाडीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, काल मुख्यमंत्र्यांनी (CM) महायुतीचा मोर्चा असेल असे सांगितले होते. मात्र, महायुतीचे दोन्ही पक्षातील नेते आणि महिला नेत्या या मोर्चात दिसल्या नाहीत, भाजपकडून आणि पक्षाकडून आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाट मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना उशीर झाला, ताटकळत बसावे लागले. यामुळे एक संतप्त झालेल्या महिलेने थेट मोर्चास्थळी जाऊन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना सुनावले. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद झाल्याचं दिसून आले आहे.

महिला नेमकी काय म्हणाली?

सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवाल महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणार्‍या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला.

रोहित पवारांची कोपरखळी

नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं. ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो नारी शक्ती पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsssफाडतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

Devendra Fadnavis: पुढल्या २० वर्षांचे आपले…; शरद पवारांकडून मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai"राजकीय विचारसरणी आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी देशहिताच्या मुद्द्यावर कधीही राजकारण आणता कामा नये," अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...