Sunday, October 18, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका; म्हणाले, "कांदा कापल्यावरही यांना…"

Devendra Fadnavis : आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका; म्हणाले, “कांदा कापल्यावरही यांना…”

मुंबई । Mumbai

जागतिक पातळीवर इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे इंधन दरवाढीचे संकट गडद झाले असतानाच, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मात्र पुरता कोलमडला आहे. उत्पादन खर्च निघणेही कठीण झाल्याने संतप्त झालेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर एल्गार पुकारला आहे.

- Advertisement -

मात्र, विरोधकांच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली असून, “हे केवळ राजकीय आंदोलन आहे; कांदा कापल्यावरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत, अशी लोकं आज आंदोलन करत आहेत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच कांद्याच्या मुद्द्यावर उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुसरीकडे, विरोधक या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक झाले आहेत. “कांद्याला सध्या केवळ ५ ते ६ रुपये भाव मिळत आहे, तर उत्पादन खर्च तब्बल १८ रुपये आहे. हा दर शेतकऱ्यांना कसा परवडणार?” असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

या आंदोलनाची धग नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या भागात तीव्रतेने जाणवत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकारच्या घोषणाबाजीवर बोट ठेवले. “सरकारने कांदा खरेदीची घोषणा केली, पण खरेदी केंद्रे सुरू कुठे आहेत? नाफेडने प्रत्यक्षात येऊन एक क्विंटल तरी कांदा खरेदी केला का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. सरकारने आधी १,२०० आणि नंतर १,५०० रुपये जाहीर केले असले, तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारात २ हजार रुपये भाव मिळावा आणि त्वरित खरेदी केंद्रे सुरू व्हावीत, अशी ठाम मागणी आता विरोधकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

शारदीय नवरात्रोत्सव : सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

0
सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुती व सप्तमी आल्यामुळे सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. 'जय देवीच्या...