Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Political : मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली शरद...

Maharashtra Political : मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली शरद पवारांची भेट; काय झाली चर्चा?

नवी दिल्ली | New Delhi

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काल (मंगळवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मात्र,यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलतांना तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज सांयकाळी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

या भेटीनंतर मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की,” आमची ही सदिच्छा भेट (Meet) होती, मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री असून शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मी मंत्री असल्याने आढावा घेण्यासाठी आलो होतो. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणं क्रमप्राप्त होतं. यावेळी शरद पवार यांच्याशी साहित्य संमेलनाबाबतची चर्चा झाली, ती चर्चा झाल्यावर आम्ही निघालो”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”आम्ही भेटल्यावर चर्चा होणारच. मात्र, या बैठकीचा तुम्ही अर्थ कसाही लावू शकता. मला वाटतं मी ज्या गोष्टी बघितल्या किंवा म्हस्केंनी जी चर्चा केली त्यातील काही गोष्टीत राजकीय निर्बंध पाळतो. आम्ही यावेळी रेल्वेबाबत चर्चा केली. १२०० साहित्यिक रेल्वेने प्रवास करणार असून रेल्वेत पहिलं संमेलन ३० तास होणार आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यावर आमची चर्चा (Discussion) झाली, असेही मंत्री सामंत यांनी म्हटले.

तसेच आम्ही शरद पवार यांना कल्पना दिली की, तुमच्याकडे येताना आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त माध्यमे तिथे आहे. मात्र, या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांच्या मतदारसंघातील प्रश्नावर चर्चा झाली, याशिवाय लोकसभेच्या (Loksabha) कामकाजात कसा भाग घ्यावा यावरही चर्चा केली, असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...