Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Political : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या पदभार स्वीकारणार  

Maharashtra Political : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या पदभार स्वीकारणार  

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Maharashtra Pradesh Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) हे मंगळवारी (दि.१८) रोजी आपल्या पदाचा मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वीकारतील. मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता पदग्रहणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काँग्रेसला (Congress) पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला जाणार आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) दारुण पराभवानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation) दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठीनी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती प्रदेश संघटनेची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सपकाळ आज आपल्या पदाची धुरा हाती घेणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, केंद्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पवन खेरा, राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगडी, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थित राहणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...