Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : विरोधकांकडून ७० कोटी महिलांचा विश्वासघात अन् विधेयकाची भ्रूणहत्या; CM...

Devendra Fadnavis : विरोधकांकडून ७० कोटी महिलांचा विश्वासघात अन् विधेयकाची भ्रूणहत्या; CM फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) लोकसभेत (Loksabha) नामंजूर झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. त्यानंतर आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाला केलेल्या विरोधावर भाष्य करत विरोधी पक्षांवर टीका केली.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की,”लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून नामंजूर होणे म्हणजे महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन आहे. हे विधेयक नामंजूर करून विरोधी पक्षांनी देशातील ७० कोटी महिलांचा विश्वासघात अन् विधेयकाची भ्रूणहत्या केली आहे. दुरुस्ती विधेयकाला (Bill) मंजुरी मिळेल असं वाटत असतानाच विरोधकांनी त्याला विरोध दर्शवला आणि देशभरात जल्लोष केला हे पाहणं खेदजनक होते”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi Winner : कोकण कन्या तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ ची विजेती; ट्रॉफीसह किती पैसे मिळाले?

पुढे ते म्हणाले की, “राज्यभरात आम्ही महिला (Women) एकत्रिकरण करणार असून, राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत. महिलांना राजकीय आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. विरोधकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देत लोकशाहीतील महिला सहभागाला धक्का दिला आहे”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केल्याचा आरोप केला.

तसेच “महिला आरक्षण विधेयकाला २९८ मते मिळाली, तर २३१ विरोधात पडली. मात्र, आवश्यक ३५२ मतांची ‘टू-थर्ड’ बहुमत न मिळाल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यामुळे लोकशाहीतील महिलांच्या सहभागाचा मृत्यू झाला आहे. सगळ्या राज्यांमध्ये ५०-५० टक्के जागा वाढणार होत्या. विरोधकांकडून विधेयकाला विरोध करण्यासाठी कारणं शोधली गेली असून, काँग्रेसने (Congress) महिला आरक्षण विधेयक पाडण्याचे पाप केले”, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काँग्रेसवर टीकास्त्र

संसदेचा विचार केला तर सध्या ७३ महिला असून, जर हे विधेयत मंजूर झाले असते तर महिलांची संसदेतील संख्या २७३ वर गेली असती. पण विरोधकांनी केलेले काम अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेस आणि साथीदारांची नेहमी अशीच प्रवृत्ती राहिली आहे. त्यांनी सातत्याने महिला विरोधी धोरणं घेतली. शाहाबानो केस असेल , संशोधन करून सर्वोच्च न्यायालयचा निकाल बदलणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजपवर अनेक आरोप केलेत पण राजस्थानच्या मुख्यमंत्री, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी भाजपच्या कार्यकाळात महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या भाजपच्या नेत्या होत्या. याधी वर्षानुवर्ष काँग्रेसचे राज्य होते पण एकाही महिलेला त्यांनी मुख्यमंत्री बनू दिले नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : ‘बंटी-बबली’ वकिलासह टोळी जाळ्यात; इंदिरानगर पोलिसांची कामगिरी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बनावट राजपत्रात नावनोंदणी करून आधारकार्डमध्ये बदल करत बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची विक्री करणाऱ्या बंटी-बबली वकिलांसह आठ संशयितांच्या इंदिरानगर पोलिसांनी...