Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : "मी कबड्डीचा खेळाडू..., इतरांसारखा न्याय मलाही मिळावा"; मंत्री भुजबळ...

Chhagan Bhujbal : “मी कबड्डीचा खेळाडू…, इतरांसारखा न्याय मलाही मिळावा”; मंत्री भुजबळ नाराजीबाबत रोखठोक बोलले

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर संधी मिळावी अशी मागणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. यासाठी त्यांनी आपण राज्यसभेवर गेल्यावर त्याजागी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देऊन त्यांना आपल्याकडे असलेले मंत्रिपद द्यावे, अशी अट घातली होती. याकरिता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी (CM) त्यांना हायकमांडशी चर्चा करून कळविणार असल्याचे सांगितले होते. पंरतु, भाजपच्या दिल्लीतील (Delhi) हायकमांडने नकार दिल्याने मंत्री भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली. राष्ट्रवादीने रविवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांवर मंत्री भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलतांना भुजबळ म्हणाले की,”मला राज्यसभा आणि लोकसभेवर जायचे होते. चार ते पाच वेळा संधी आली पण दुर्देवाने ती मिळाली नाही. यावेळी देखील जायचे होते पण ती देखील संधी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार त्यामुळे मलाही हाच नियम लागू करावा, अशी विनंती केली.त्यावर संवाद साधण्यासाठी वेळ लागला असावा”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”भाजपकडे हा विषय गेला तेव्हा ज्यावेळी मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होईल तेव्हा विचार करू असे सांगण्यात आले. त्यामुळे भाजपने नकार दिला यात तथ्य नाही. मी नाराज नसून, इतरांना जो न्याय दिला तोच मला लावावा असे म्हटले होते. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असे मला वाटत नाही. आज नही तर कल, कल नही तो आगे, मी कबड्डीचा खेळाडू असून बुद्धीबळाचा नाही. मला बुद्धीबळ जमत नाही”, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजीच्या विषयावर भाष्य केले.

ताज्या बातम्या

कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी...