Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSudhir Mungantiwar : "ठाकरे ब्रँड आता बाजारात चालत नाही"; आमदार मुनगंटीवारांचा राज-उद्धव...

Sudhir Mungantiwar : “ठाकरे ब्रँड आता बाजारात चालत नाही”; आमदार मुनगंटीवारांचा राज-उद्धव यांना खोचक टोला

मुंबई | Mumbai

राज्य सरकारने (State Goverment) काही दिवसांपूर्वी राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा जीआर काढला होता. यावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आक्रमक भूमिका घेत कडाडून विरोध केला होता. त्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत (Mumbai) मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यानंतर सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला होता.

- Advertisement -

त्यानंतर झालेल्या मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी बोलतांना महाराष्ट्रात (Maharashtra) ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरेंनी देखील सामानाला (Saamana) दिलेल्या मुलाखतीत ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यानंतर आता ठाकरेंच्या या विधानावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले की, “ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड असतात, प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही”, अशा शब्दात त्यांनी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे.

तसेच “उद्धव ठाकरे स्वत:ला सामान्य समजत असतील, कारण ते चिंताग्रस्त झाले आहेत. बाकी सर्वसामान्य जनता जे मतदार आहेत ते आमच्यासोबत आहे. मतदानातून (Voting) ईव्हीएम (EVM) बटण दाबून त्यांनी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे हे सांगितले आहे. राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय की जादूटोणा वैगेरे भाषा केली जाते. जादूटोणा करून इतक्या जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असती, देशातला जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा जगात नाही. जादूटोणा असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावे लागले नसते. ती कपोलकल्पित कथा आहे”, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “आज कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर भाषिक अन्याय केला जातो. मात्र महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी त्या भागातील मराठीच्या संरक्षणासाठी निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे सरकार मराठीच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनशील आणि वचनबद्ध आहे. जर राज ठाकरे यांच्याकडे काही ठोस सूचना असतील, तर त्यांचे स्वागत आहे. पण मराठीवर केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकारण नको”,’ असे म्हणत मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या धमकीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election : नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला; बंडखोर रेश्मा...

0
जळगाव | Jalgaon स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीसमोर (Mahayuti) उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे...