Wednesday, July 15, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेले बंगले, फॉर्म...

Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेले बंगले, फॉर्म हाऊस ‘शासनजमा’ होणार; २९ जण न्यायालयात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Nashik Divisional Education Office) कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात (Shalarth ID Scam) आता तपास यंत्रणेने संशयितांची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. बोगस आयडीच्या (Fake ID) माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितांनी कमावलेली काळी कमाई आता जप्त केली जाण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील जुन्या व नव्या संशयितांची ‘प्रॉपर्टी अटॅच’ (मालमत्ता जप्त) करण्याची प्रक्रिया नाशिक शहर गुन्हे शाखेने (आर्थिक गुन्हे शाखा) सुरू केली असून, संशयितांचे बँक व्यवहार पडताळण्यासाठी बँकांची मदत घेतली जाणार आहे.

- Advertisement -

नाशिक शहर पाेलिसांच्या (Nashik City Police) विशेष तपास पथकाचे(एसआयटी) सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व इओडब्ल्यूचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी घोटाळ्यात ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आता तपासाचा मोर्चा संशयितांच्या अपसंपदेकडे वळवला आहे. संशयितांनी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांतून नाशिक व परिसरात बंगले, फार्म हाऊस, सोने, जमिनी (Land) आणि महागड्या गाड्या खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे आर्थिक व्यवहार नेमके कुठून, कसे आणि किती कोटींचे झाले, याचा कच्चाचिठ्ठा काढण्यासाठी बँकांकडून संशयितांच्या खात्यांचे तपशील मागवण्यात आले आहेत. ​

हे देखील वाचा : Shalarth ID Scam : पासष्ट शाळांचे बोगस जाळे; धुळे जिल्हा रिपाइं शिक्षक आघाडीचा अध्यक्ष गजाआड

बनावट (Fake) आदेशांवर उपसंचालकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणून देणारा आणि ३४ हून अधिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी २० ते ३५ लाख रुपये उकळणारा मुख्य एजंट प्रशांत वाडिले (रा. धुळे) सध्या १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे. तपासादरम्यान वाडिलेच्या धुळ्यातील डोळे दिपवणाऱ्या सुमारे तीन कोटींच्या आलिशान बंगल्याची माहिती समोर आली असून, हा बंगला सील करून शासनजमा करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. वाडिलेने उकळलेले कोट्यवधी रुपये शिक्षण विभागातील कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले, याचाही शोध घेतला जात आहे. गुन्हे शाखेचा तपास तीव्र हाेत असल्याने संशयितांची पाचावर धारण बसली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत तब्बल दाेन हजार संशयित निष्पन्न झाले असून १६ जणांविरुद्ध सबळ पुरावे आहेत. पोलीस कारवाईच्या भीतीने तब्बल २९ संशयितांनी नाशिक सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी धाव घेतली आहे.

यांची जामीनासाठी धाव

मुंबई उच्च न्यायालय : गुलाब ठाकरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गणेश पाटील, निखिल देशमुख, विलास जोशी, अविनाश देशमुख, बाजीराव पाटील, तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, उदय पंचभाई, शरद शिंदे, अजय टिकर, सुधाकर वारूळे, लक्ष्मण मोहणे, पुरूषोत्तम धनगर यांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत.
नाशिकरोड सत्र न्यायालय : मिनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनिष कदम, शशिकांत हिंगोनेकर, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देविदास महाजन, अविनाश उर्फ पप्पू पाटील, मनोज पाटील, शरद शिंदे, तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत.

हे देखील वाचा : Shalarth ID Scam : घोटाळ्यातून बांधला तीन कोटींचा बंगला, शिक्षक आयडी मंजुरीसाठी २० ते ४० लाखांचा रेट; वाडिलेचे साम्राज्य पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या

यांच्या मालमत्तांवर टाच येणार

नितीन उपासनी (सेवानिवृत्त अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ – सध्या कारागृहात)
​भाऊसाहेब चव्हाण (तत्कालीन शिक्षण उपसंचालक)
नितीन बच्छाव (तत्कालीन शिक्षणाधिकारी)
यांसह वेतन पथक अधीक्षक आणि काही संशयित शिक्षक.

हे देखील वाचा : Nashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे अटकेत

ताज्या बातम्या

Nashik Shivsena UBT News : आमची निष्ठा पक्षासोबतच, मुळीच फुटणार नाही!...

0
मुंबई | Mumbai आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि पक्षासोबतच राहू. विकास निधीच्या नावाखाली पक्षांतराचे कितीही आमिष दाखवले, तरी आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशीच...