नाशिक | Nashik
पंचवटीतील (Panchvati) फुलेनगर परिसरात (Phulenaga Area) वर्चस्वाच्या वादातून सन २०२३ पासून सुरू असलेला गँगवॉरचा थरार अद्यापही थांबलेला नाही. जुलै २०२५ मधील गोळीबार आणि तुफान दगडफेकीच्या पार्श्वभूमीनंतर आता जुलै २०२६ मध्ये पुन्हा एकदा महाले आणि खरात गट समोरासमोर आले आहेत. शेषराव महाराज चाैकात संशयित सुमित महाले याने त्याच्या साथीदारांसह थेट विरोधी गटातील जय संतोष खरात याच्या घरावर हल्ला चढवला. “मीच इथला भाई आहे, कोणी नादी लागलं तर मुडदा पाडीन!” असे धमकावत सुमितने कोयता उगारून आणि बिअरच्या बाटल्या फेकून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सुमित महाले, उषा महाले, ललिता गांगुर्डे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे अटकेत
शनिवारी (दि. ११) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संदीप लॉन्ड्रीजवळ फिर्यादी व जयची आई वनिता संतोष खरात (वय ४०) या घराबाहेर ओट्यावर स्वयंपाक करत होत्या. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून संशयित सुमित महाले, मोन्या मोरे, काळ्या, सच्या भुताळ्या, उषा महाले, ललिता गांगुर्डे व त्यांच्या साथीदारांनी तेथे येत शिवीगाळ सुरू केली. सुमित महाले याने वनिता यांच्या दिशेने धारदार कोयता फेकून मारला, मात्र त्यांनी तो चुकविल्याने अनर्थ टळला. यानंतर संशयितांनी वनिता यांच्या घरावर बिअरच्या बाटल्या, विटा आणि दगड फेकून मारले. सुमितने हातात कोयता नाचवत गल्लीतील गाड्यांच्या काचा फोडल्या आणि नागरिकांना धमकावले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक पुंडलिक पावशे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
गेल्या वर्षी भंडाऱ्यात गोळीबार
जुलै २०२५ मध्ये मुंजोबा महाराज मंदिरात भंडारा आणि जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना संशयित विकी वाघ, ऋषिकेश उर्फ बाबा परसे, जय खरात, जय मोरे उर्फ टिंगरी व इतरांनी सुमित महालेच्या कुटुंबावर हल्ला केला होता. विकी वाघ याने गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार केला होता. तर, दगडफेकीत सुमितच्या पायाला दुखापत झाली होती आणि स्थानिकांनी भीतीने घरे बंद करून घेतली होती.
हे देखील वाचा : Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेले बंगले, फॉर्म हाऊस ‘शासनजमा’ होणार; २९ जण न्यायालयात
‘मोक्का’ लागूनही गुन्हेगारी!
वर्चस्वाच्या लढाईतून ११ मार्च २०२३ रोजी प्रेम महाले आणि युवराज शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी मे २०२३ मध्ये मुख्य संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात आणि संदीप आहिरे यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या गटांतील काही संशयित जामिनावर बाहेर येताच परिसरात पुन्हा टोळीयुद्ध सुरू झाले आहे.
खरात-महाले गँगचा पूर्वाेतिहास
१. जुलै २०२५ मधील गोळीबार आणि दगडफेकीच्या थरारानंतर बरोबर एका वर्षाने, म्हणजेच जुलै २०२६ मध्ये महाले-खरात गँग पुन्हा आमने-सामने
२. संशयित सुमित महाले याने फिर्यादी वनिता खरात यांच्या दिशेने थेट जीवघेणा कोयता फेकून मारला, सुदैवाने त्या बचावल्या.
३. हातात धारदार कोयता घेऊन सुमितने गल्लीत उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या, तर महिला संशयितांनी विटा-दगडांचा वर्षाव केला.
५. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून पंचवटीतील मायको दवाखाना, मुंजाबाबा चौक ते फुलेनगर भागात महाले-वाघ-खरात गँगमध्ये सातत्याने संघर्ष
६. संशयित सुमित महालेवर यापूर्वीच २०२४ आणि २०२५ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून, दोन्ही गटांवर खून, खंडणी आणि अवैध शस्त्रांचे तब्बल ३२ हून अधिक गुन्हे आहेत.
मुद्दे
मार्च २०२३ मध्ये सुमीतची आई उषा(वय ४०) यांच्यावर गाेळीबार
गोळीबारात एक पाळीव कुत्राही जखमी हाेता
महाले, वाघ, खरात, गांगुर्डे, माेरे, आहिरे, शेळके, मिरके व इतरांवर गंभीर गुन्हे
फिर्यादी सुमीतला गावठी कट्टा विक्री प्रकरणात फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक
प्रेम महालेसह इतरांवर अकराहून अधिक गुन्हे
हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकमध्ये बिश्नोई गँगचे समर्थक! एटीएसच्या कारवाईनंतर ‘टेरर टास्क’ टळला; परिक्षेत्रातील १५ जणांना दिलासा




