नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) झारवड बुद्रुक येथील जमीन प्रकरणात बनावट सह्या आणि खोटे संमतीपत्र तयार करून फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयितांना न्यायालयाने झटका दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, तक्रारदारांनी सादर केलेला ‘फॉरेन्सिक’ अहवाल संशयितांच्या गळ्याचा फास ठरला आहे.
हे देखील वाचा : Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेले बंगले, फॉर्म हाऊस ‘शासनजमा’ होणार; २९ जण न्यायालयात
सायली मोहाडकर व अनुराधा मोहाडकर यांनी २०१६ मध्ये झारवड बुद्रुक येथील गट क्र. १०१ मधील ४० गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र, संशयित कौस्तुभ धामणे, चंद्रकांत धामणे व इतरांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर या दोघींच्या बनावट (Fake) सह्या करून खोटे संमतीपत्र तयार केले. या आधारे नगररचना विभागाची दिशाभूल करत, तक्रारदारांच्या जमिनीतून १२ मीटरचा रस्ता दाखवून ले-आउट आणि बांधकाम परवानगी लाटण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकमध्ये बिश्नोई गँगचे समर्थक! एटीएसच्या कारवाईनंतर ‘टेरर टास्क’ टळला; परिक्षेत्रातील १५ जणांना दिलासा
जमिनीतून अचानक रस्ता (Road) मंजूर झाल्याने मोहाडकर यांना संशय आला. त्यांनी तातडीने संमतीपत्रावरील सह्यांची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून (फॉरेन्सिक) तपासणी केली. या अहवालात सह्या पूर्णपणे बनावट असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले. न्यायालयात तक्रारदारांच्या वतीने फौजदारी कायदेतज्ज्ञ अॅड. सुयोग शाह आणि अॅड. मंदार भानोसे यांनी हा शासकीय यंत्रणेची फसवणूक करणारा आर्थिक गैरव्यवहार असल्याचे सांगत जामिनाला तीव्र विरोध केला. न्यायालयाने (Court) फॉरेन्सिक पुरावे ग्राह्य धरत जामीन फेटाळल्याने पोलिसांचा पुढील तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : महाले-खरात गटात राडा; फुलेनगरात विराेधी गटाच्या घरावर बिअरच्या बाटल्या फेकत ‘भाई’ची दहशत, म्हणाला “मीच इथला…”




