Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : राहुल गांधींनी आता स्टँडअप कॉमेडियन बनावे - CM फडणवीस

Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता स्टँडअप कॉमेडियन बनावे – CM फडणवीस

नागपूर | Nagpur

मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये शनिवारी (दि.१९) रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मिमिक्री केल्यामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी आता स्टँडअप कॉमेडियन बनले पाहिजे असे म्हणत टोला लगावला आहे.

- Advertisement -

नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राजकीय घडामोडींसोबतच नागपूर आणि विदर्भातील (Nagpur and Vidarbha) झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक विकासाचा आणि गुंतवणुकीचा पट मांडला. या सर्व औद्योगिकीकरणामुळे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सोलर क्षेत्रात चीनला टक्कर; नागपुरात अत्याधुनिक निर्मिती

यावेळी नागपूरमधील सोलर मॉड्युल तयार करणाऱ्या अत्याधुनिक कारखान्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “या कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोलर मॉड्युलची निर्मिती केली जात आहे. इतके अ‍ॅडव्हान्स इंटिग्रेशन सध्या देशात कुठेही उपलब्ध नाही. नागपुरात सर्वात स्मार्ट मॉड्युल तयार होत असून, या माध्यमातून भारताची सोलर क्षेत्रात चीनसोबत स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.” २०२४ मध्ये भूमीपूजन झालेल्या या प्रकल्पात अल्पावधीतच तब्बल ५ हजार कामगारांना रोजगार मिळाला असून, हे महाराष्ट्राच्या बदलत्या औद्योगिक परिसंस्थेचे (इकोसिस्टम) उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

बुटीबोरीत जागेची टंचाई; अतिरिक्त औद्योगिकीकरणासाठी ५ हजार एकर जमीन अधिग्रहित होणार

विदर्भातील गुंतवणुकीच्या ओघाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आता अतिरिक्त जागा शिल्लक उरलेली नाही. सर्व जागांवर प्रकल्प सुरू असल्याने आता नवीन अतिरिक्त ‘बुटीबोरी’ तयार केली जात आहे.महिंद्रा कंपनीला सुमारे १ हजार एकर जागा देण्यात आली असून येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. तसेच अनेक मोठे उद्योग सध्या गुंतवणुकीच्या प्रतीक्षा यादीत (Waiting List) आहेत.सावनेर परिसरात सुमारे ५ हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या जागेसाठी आधीपासूनच गुंतवणूकदारांची मोठी मागणी नोंदवण्यात आली आहे”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : दिंडोरी तालुका लवकरच दुष्काळग्रस्त घोषित होणार –...

0
ओझे | विलास ढाकणे | Oze राज्य सरकारने महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत दुष्काळ जाहीर केला असला तरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक हे दोन तालुके...