Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : "उद्धवजी तुम्हाला सत्तेत येण्याचा..."; मुख्यमंत्री फडणवीसांची थेट सभागृहातच...

Maharashtra Politics : “उद्धवजी तुम्हाला सत्तेत येण्याचा…”; मुख्यमंत्री फडणवीसांची थेट सभागृहातच ऑफर, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत गौरवोद्वार काढत आणि आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेनेला (Shivsena) चिमटे काढले. तसेच त्यांनी थेट सभागृहातच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ” उद्धव ठाकरेजी (Uddhav Thackeray) २०२९ पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. परंतु , त्यावर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू,” असे म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “अंबादास दानवे हे मूळचे भाजपातले (BJP) आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडलं. त्यानंतर मग अंबादास दानवे हे आमचा त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरंतर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे मात्र आता थोडे बदल झाले आहेत. दानवे पुढच्या अधिवेशनाच्या आधी निवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० चा आहे आणि मी २२ जुलै १९७० चा आहे. पण एक सांगतो जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते आहेत तोपर्यंत आपण युवा नेते राहू शकतो, कारण राहुल गांधी माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठे आहेत. त्यामुळे त्यांना युवा नेता म्हटले जात आहे तोपर्यंत आपल्याला चिंता नाही.” असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

तसेच “अंबादास दानवे हे माझ्या पेक्षा लहान आहेत पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत. जरी ते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असले तरीही ते मूळ आमच्या भाजपाचे आहेत. अंबादास दानवे यांचं जीवन भाजपातच सुरु झालं. एक प्रभावी नेते म्हणून काम करत होते. काही वाद झाले आणि पक्षाने त्यांना सोडलं. पण त्यांचं राजकीय (Political) जीवन भाजपात घडलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केलं. भाजपाच्या मुशीत तयार झाल्याने त्यांच्यात चिकाटी, अभ्यासू वृत्ती पाहण्यास मिळते. इतर पक्षांमध्ये असं होत नाही असं नाही. पण १५ वर्षे ते भाजपात होते,” असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...