Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; काय झाली चर्चा?

Maharashtra Politics : काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आमदार अमीन पटेल यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली.

- Advertisement -

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा कार्यकाल संपला आहे. त्यानंतर काँग्रेसने (Congress) विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने ही मागणी केली. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती अधिक समन्वयपूर्वक हाताळण्यासाठी आवश्यक त्या धोरणांवरही आजच्या बैठकीत या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान, काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नावाची चर्चा असून, त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्या नावास होकार दर्शविल्याचे बोलले जात आहे. तसेच काँग्रेस नेत्यांच्या आजच्या बैठकीत मनसेच्या (MNS) युती संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुका मनसेसोबत लढवण्याची शक्यता

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) एकत्र लढविल्या होत्या. यात लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला घवघवीत यश मिळाले होते. पंरतु, विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोबत युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मविआत बिघाडी होण्याची शक्यता असून, लवकरच उद्धव ठाकरे याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : ६३८ शालार्थ आयडी एकट्या जळगावचे; मान्यतांमागे ‘आर्थिक...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) नाशिक एसआयटीने (Nashik SIT) शुक्रवारी(दि. २४)  जळगावचे तत्कालिन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगाेणीकर याच्या मुसक्या आवळल्यानंतर...