नाशिक । प्रतिनिधी | Nashik
अंबडगाव (एमआयडीसी) परिसरातील (Ambad gaon MIDC) एका हार्डवेअर दुकानदाराची ‘एशियन पेंट्स’ कंपनीची डिलरशिप मिळवण्याच्या नादात तब्बल ७ लाख ४९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फिर्यादी आदित्य पदम जाधव (वय २१, रा. गजानन पार्क, फडोळ मळा, अंबड, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अंबड एमआयडीसीत जाधव यांचे ‘तुळजाई हार्डवेअर’ नावाचे दुकान असून, तेथे हार्डवेअर साहित्यासोबतच एक कंपनीचे कलर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपल्या दुकानात एशियन पेंटचे साहित्यही ठेवावे, या उद्देशाने त्यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी कंपनीच्या dealership@asianpaints.com या अधिकृत दिसणाऱ्या मेलवर डिलरशिपसाठी रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर १ मे २०२६ रोजी customercare@asianpaints.shop या बनावट मेलवरून त्यांना एक रजिस्ट्रेशन फॉर्म प्राप्त झाला, जो त्यांनी भरून पुन्हा पाठवला.
राजू सरकारचा बनावट कॉल
४ मे २०२६ रोजी मोबाईल क्रमांक (Mibile Number) ९१२२९०३९६७ वरून एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःचे नाव राजू सरकार असे सांगून तो ‘एशियन पेंट्सच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे भासवले. “तुम्ही डिलरशिपसाठी दिलेला फॉर्म मंजूर झाला असून, पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल,” असे सांगत जाधव यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांखाली रकमेची ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून घेतले. यानुसार, जाधव यांनी वेळोवेळी विविध खात्यांवर वर्ग केली. यात, रजिस्ट्रेशन फी फोन पे द्वारे खाते क्रमांक ४४३७१०११००११८६० वर २४ हजार ९९९ रुपये पाठवले. यानंतर, फोन पे द्वारे खाते क्रमांक ४४३७१०११००११८६० वर ७० हजार रुपये दिले. तर, आयडीबीआयन बँक शाखा पाथर्डी फाटा खात्यावरून एनईएफटीद्वारे ५०,००० रुपये पाठविले. याच खात्यातून पुन्हा इतर खात्यांवर ८०,००० रुपये व २,००,००० रुपये पाठविले. ही रक्कम भरल्यानंतर त्यांनी कन्फर्मेशन लेटर आणि पावती पाठवली व पाच लाख रुपयांपर्यंत पुरवठा करण्याचे आमिष दाखविले.
नऊ टप्प्यांत पाच लाख रुपये दिले त्यानंतर ५,०००,००० रुपयांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर खालीलप्रमाणे ९ टप्प्यांत रक्कम पाठवली
५/०५/२०२६: १,००,०००/-
५/०५/२०२६: ५०,०००/-
१६/०५/२०२६: ५०,०००/-
१२/०६/२०२५: ७०,०००/-
१६/०६/२०२५: ३०,०००/-
१६/०६/२०२५: ४०,०००/-
१६/०६/२०२६: ६०,०००/-
१६/०६/२०२६: ३५,०००/-
१७/०६/२०२६: ६५,०००/
एकूण : ५,००,०००/- रुपये




