Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : इथेनॉल घोटाळा प्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या - काँग्रेस...

Maharashtra News : इथेनॉल घोटाळा प्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचा लाभ  झाला. मात्र, त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. ‘ई-२०’ हा मोठा घोटाळा असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) जबाबदार आहेत, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सोमवारी इथेनॉल घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आज (सोमवारी) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी ‘ई -२०’ वरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते. पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा (Scam) झाला असून त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहने बंद पडली. इथेनॉलची वकिली करणारे गडकरीच असून या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत. या दलालांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु असून त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झाली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत, अशी टीकाही सपकाळ यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...