Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Khadse vs Girish Mahajan : "देवाभाऊंचा आशीर्वाद असेपर्यंतच महाजनांना किंमत";...

Eknath Khadse vs Girish Mahajan : “देवाभाऊंचा आशीर्वाद असेपर्यंतच महाजनांना किंमत”; खडसेंचे जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

जळगाव | Jalgaon

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनीट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ७२ जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हनीट्रॅप (Honey Trap) प्रकरणी चौकशी सुरु असून आहे. या प्रकरणात जळगावच्या प्रफुल्ल लोढा यांचे नाव आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे यावरून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यामुळे जळगावचे वातावरण तापले असून दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले होते. त्यावर खडसेंनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की,”प्रफुल्ल लोढाकडे (Prafulla Lodha) असलेले मटेरियल त्याने इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्याला वारंवार पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. तो जर बाहेर आला तर आपले कारनामे उघड होतील अशी भिती मनात आहे, पण जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन यांची किंमत आहे, एकदा देवेंद्रजी यांनी डोक्यावरचा हात काढला की महाजनांना सळो की पळो करावे लागेल असा हल्लाबोल त्यांनी केला.

तसेच “लोढा जर बाहेर आला किंवा जामीनावर (Bail) सुटला तर, त्याच्याकडून सत्य निघाल्यास यांचा पर्दाफाश होऊ शकतो, मी जे आहे ते उमद्या मनाने करणारा माणूस आहे, मी मागून वार करणारा माणूस नाही, अशा शब्दात खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर (Replay) दिले आहे.

मी मागून काड्या केल्या नाहीत

आतापर्यंत मी लढलो ते समोरून लढलो, मागून काड्या केल्या नाही हा जो प्रफुल्ल लोढा आहे, तो गिरीश महाजन यांच्या बंगल्यामध्ये सातत्याने राहायचा. महाजन मंत्री असताना त्यांच्यासोबत तो रहायचा, यात पुरावा देण्याची काही गरज नाही कुणीही सांगू शकेल. मी असे कधीच म्हटले नाही की लोढा मला भेटला नाही. मी पहिल्या मुलाखतीतच म्हटले होते की माझासुद्धा त्याच्यासोबत फोटो असू शकतो. माझा मूळ विषय हाच आहे की नाशिकच्या हनीट्रॅपच्या प्रकरणांमध्ये कोणकोण आहे त्याचे मूळ शोधणे. यातला एक जण आपल्या विभागातला आहेच मी त्यापर्यंत लवकरच पोचेल आणि हा विषय शेवटपर्यंत नक्कीच जाईल असा विश्वाससुद्धा एकनाथ खडसे यांनी नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना व्यक्त केला.

कोणत्याही चौकशीला तयार

आता जर तुमची ताकद असेल आणि हिम्मत असेल, खऱ्या अर्थाने तुमची पत वरच्या बाजूला असेल, तर माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कराच, माझ्या मुलाच्या आत्महत्येची तसेच खुनाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करावी, मी तयार आहे. जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन याची किंमत आहे, एकदा देवेंद्रजी यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी १०० कुत्रे लागतात तशी याची हालत होणार आहे अशी बोचरी टीकाही खडसे यांनी केली.

मानसिक संतुलन माझं की गिरीशचे बिघडले?

देवा भाऊ यांना मी सल्ला देणार नाही, मात्र ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. तुम्हाला काय वाटले मानसिक संतुलन माझे बिघडले की गिरीशचे बिघडले असा सवालही खडसेंनी विचारला. गिरीश भाऊंची चांगली ख्याती आहे. सर्वांनाच माहिती आहे, ज्यावेळी प्रफुल्ल लोढा यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी रामेश्वर नाईक हा त्या ठिकाणी उपस्थित होता, रामेश्वर नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असे प्रफुल लोढा यांनी म्हटले आहे. आणि धमकी देणारेच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत.

लोढाने २०० कोटी कमावले

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आले आहे. नाना पटोले यांनी या संदर्भातला आरोप केला होता. प्रफुल लोढा प्रकरणाचीही चर्चा होते आहे. आता या प्रकरणात अनेक लोक अडकले आहेत असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कोणत्याही पक्षाचा माणूस असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. हनी ट्रॅपचे खूप मोठे रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री यामध्ये आहेत. ज्याचे नाव पुढे आले तो लोढा याने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान २०० कोटींची वसुली केली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...