Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde Chandrashekhar Bawankule: "…आता मला काय विचारताय तुम्ही?" एकनाथ शिंदे चंद्रशेखर...

Eknath Shinde Chandrashekhar Bawankule: “…आता मला काय विचारताय तुम्ही?” एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?

मुंबई | Mumbai
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसह सत्ताधारी आमदार उपस्थित होते. त्यातच या कार्यक्रमात एक प्रसंग घडला ज्याची चर्चा सध्या होत आहे. या चहापानाच्या कार्यक्रमातील एकनाथ शिंदें चंद्रशेखर बावनकुळेंवर रागावताना दिसत आहे.

सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत रागात बोलत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना आता मला काय विचारताय तुम्ही असा संतापून सवाल केला. हे विधान कॅमेऱ्यात रॅकोर्ड झाले. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणत्या विषयावर होता हे समोर आले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचा त्रागा पाहता ते रागावून बावनकुळेंना प्रश्न करत असल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

त्रिभाषा धोरण जीआर रद्द
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आजपासून पावसाळी अधिवेशन
यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार आज दिनांक 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेराव घालू शकतात. सध्या राज्यात शक्तीपीठ महामार्ग, लाडकी बहीण, हिंदी भाषा सक्तीवरुन युटर्न हे मुद्दे गाजत आहेत. त्यामुळे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....