बीड | Beed
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) नाशिकमधील (Nashik) एका कार्यक्रमात बोलताना “गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्षच उभा राहील”, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्या बीडमधील (Beed) आष्टीत (Ashti) झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या की,”नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो. तेव्हा ते म्हणाले ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेले तर एक पक्ष निर्माण होईल असं त्यांनी म्हटले होते. यानंतर त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हणाले की, हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजपा) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल? आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मी गुंडासाठी गुंड आणि बंडाला बंड
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, “मी मंत्री असले काय, नसले काय मला फरक पडत नाही. मंत्रिपदाचे (Ministry) १८२५ दिवस उरले आहेत. प्रत्येक दिवस परळीसाठी आहे. मी गुंडासाठी गुंड आणि बंडाला बंड आहे. सगळ्यांनी शक्य तेवढं चांगल वागा, मंत्रीपदामुळे अधिकार येतात. आता सत्तेचे माझ्याकडे १८२५ दिवस आहेत, वरचे २२५ दिवस असेच जातात. माझ्या १६०० दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचे काम करेल”, असेही त्यांनी म्हटले.
ऊसतोड कामगारांच्या पाठीशी कायम उभी
तसेच “मी पर्यावरण मंत्री (Environment Minister) झाले म्हणजे ऊस तोडायचे बंद होणार नाही. मी नुसत्या गप्पा मारणार नाही. पण त्यांनी ऊस तोडू नये असं मला हृदयातून वाटतं. मात्र यांची पुढची पिढी आता ऊस (Sugar Cane) तोडणार नाही. ऊसतोड कामगारांसाठी मी नेहमी उभी राहील.कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील. हा वाक्यप्रचार अर्थ आहे. नाहीतर तुम्ही लगेच काहीही अर्थ लावालं”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.