Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : "कुणी कुणाला काढलंय तेच कळत नाही"; मतदार यादीतील घोळावरून...

Raj Thackeray : “कुणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर प्रहार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र निवडणूक आयोगासोबत (Maharashtra Election Commission) बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या बैठकीत बोलताना आम्ही निवडणूक आयोगाला मतदार यादीमधील घोळ दाखवून दिले असल्याची माहिती या नेत्यांनी दिली. यावेळी राज यांनी आपल्या ठाकरे शैलीत निवडणूक आयोगावर प्रहार केला.

- Advertisement -

ते म्हणाले की, “काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या प्रतिनिधींना भेटलो. आज निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीला भेटलो. निवडणूक (Election) म्हटल्यावर राजकीय पक्ष आले. मतदान करणारा महाराष्ट्रातील मतदार आला. निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात. राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. राजकीय पक्षांना आयोग मतदार याद्या दाखवत नसेल, तर पहिला घोळ इकडे आहे. याद्याच नाही दाखवणार. 2024 च्या निवडणुका होण्याआधी आणि नंतरच्या दोन याद्या दाखवणार आहे. २०२४ च्या यादीतील काही नावं वाचून दाखवतो. म्हणजे यादीतील घोळ लक्षात येईल. यामध्ये मतदारसंघ क्रमांक १६०, कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वडिलांचं नाव दीपक कदम, वय वर्ष २३.. आता दीपक कदम, वडिलांचं नाव रघुनाथ कदम, वय ११७.. मतदारसंघ १६१ चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वय वर्ष १२४, वडिलांचा तपशील महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय ४३.. कोणी कोणाला काढलंय तेच कळत नाही..” असं राज ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला.

पुढे ते म्हणाले, २०२४ नंतरच्या यादीत ना फोटो आहे ना पत्ता, फक्त नावं आहेत. पाच वर्ष महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत. मग याद्या सुधारण्यासाठी आणखी सहा महिने गेले तर काय फरक पडतो. याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. यावर ते काय निर्णय घेतात ते पाहू आणि सर्व राजकीय पक्ष एकत्रित निर्णय घेऊ,असं राज ठाकरे म्हणाले. बातम्या लागल्यावर वेबसाईटवरुन याद्या गायब होतात आणि निवडणूक आयोगाला माहितीच नाही”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

तोपर्यंत निवडणुका घेऊ नका

हा २०२४ च्या निवडणुकी आधीचा घोळ. २०२४ नंतर यादी दिली. त्यात फक्त नाव आहे. फोटो नाही. पत्ता नाही. काही नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला बोललो तर म्हणतात राज्य निवडणूक आयोगाकडे येते. राज्य आयोग म्हणतो केंद्राकडे येते. दोन्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत. या याद्यात सुधारणा होत नाही. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सांगितलं” असेही राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...