Saturday, September 26, 2026
Homeमुख्य बातम्याManoj Jarange Patil : "बंडू जाधव तू आयुष्यातील..."; मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं...

Manoj Jarange Patil : “बंडू जाधव तू आयुष्यातील…”; मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

जालना | Jalna

शिवसेनेचे (शिंदे गट) परभणीतील खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव (Bandu Jadhav) यांनी आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्यास नकार दिल्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका करत, “संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांचे ऐकून बंडू जाधव यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे,” असा घणाघाती आरोप केला. त्यांनी आज (रविवारी)अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला.

- Advertisement -

मेळावा रद्द करण्याच्या इशाऱ्यानंतरही बंडू जाधव ठाम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत परभणीतील स्टेडियमवर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी हा मेळावा रद्द करण्याचे आवाहन केले होते. फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यानही जरांगे यांनी मेळावा न घेण्याची सूचना दिली होती. मात्र, “रात्री सांगितले असते तर विचार केला असता, आता लोक मेळाव्याच्या ठिकाणी जमा झाले आहेत,” असे स्पष्ट करत बंडू जाधव मेळावा घेण्यावर ठाम राहिले आहेत.

जरांगे पाटलांचे गंभीर आरोप आणि इशारा

राजकारणाला अवकळा लागेल

मराठा समाजाने (Maratha Community) बंडू जाधव यांचे राजकीय अस्तित्व निर्माण केले, परंतु त्यांनी मराठा समाजाला डावलून शिंदे-शिरसाटांच्या षडयंत्राला साथ दिली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या राजकारणाला आता अवकळा लागेल, असा टोला जरांगे यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारत असून, याची परतफेड १२ तारखेला मुंबईत केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गुंडगिरीवर भाष्य

पुढे ते म्हणाले की, “तुझ्याकडे ५०० गुंड असतील, पण त्यावर राजकारण चालत नाही. अशा गुंडांना आम्ही रोज कोलतो,” अशा कडक शब्दांत जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच तुझ्यासाठी जीवाचे रान केले, तुझी बाजी नव्हती, तेव्हा पलटीच मारायला लावली आणि तू आज मराठ्यांच्या उरावर नाचतो का? असेही त्यांनी म्हटले.

परभणीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

वाद चिघळण्याची शक्यता आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, परभणी पोलिसांनी (Parbhani Police) खासदार बंडू जाधव यांच्या घराबाहेर आणि मेळावा होणाऱ्या स्टेडियम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलिस बंदोबस्तात बंडू जाधव मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाले असून, सर्व इशाऱ्यांना बाजूला सारून हा कार्यक्रम पार पडत आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पीक कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू;...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर...