Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : ठाकरे बंधूंची 'शिवतीर्थ'वर अडीच तास खलबतं; पडद्यामागील 'राज'कारण आले...

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंची ‘शिवतीर्थ’वर अडीच तास खलबतं; पडद्यामागील ‘राज’कारण आले समोर

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही भावांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब तर राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर दोन्ही भावांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंची (Thackeray Brother) ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित बैठक असल्याचे बोलले जाते.दोन दिवसांपूर्वीच या बैठकीचे नियोजन ठरले होते. आगामी महापालिका निवडणुका (NMC Election) आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा देखील झाली.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक यासह महत्त्वाच्या महापालिका एकत्र लढविण्याबाबत राज आणि उद्धव यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर येत्या २ ऑक्टोबर रोजी होणार्‍या दसरा मेळाव्यात दोन्ही बंधू युतीची घोषणा करणार असल्याचे बोलले जाते. तसेच इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) राज ठाकरेंसोबत युती करण्यास विरोध झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भेटीमागील महत्त्वाची कारणे

दसरा मेळाव्याचे आमंत्रण

गेल्या काही वर्षांपासून मनसे आणि शिवसेनेचे वेगवेगळे मेळावे होत आहेत. मनसेचा गुढीपाडव्याला तर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसऱ्याला मेळावा होत असतो. पंरतु, यंदा दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असल्याने कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळावा एकत्र झाल्यास दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा राज आणि उद्धव ठाकरे यांचा कयास आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मेळाव्याचे आमंत्रण देखील उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दिल्याची चर्चा आहे.

भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला अडचण

राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती मजबूत स्थितीत आहे. या युतीला प्रभावीपणे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे.ठाकरे बंधूंची संभाव्य युती ही भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसू शकतो.यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची...

0
मुंबई | Mumbai राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड (Pawanraje Nimbalkar Case) प्रकरणाचा निकाल आज (शनिवारी) तब्बल २० वर्षांनी देण्यात आला....