Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : आज किती जणांचा शपथविधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : आज किती जणांचा शपथविधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

महायुती सरकारचा शपथविधीसोहळा आज पार पडणार आहे. यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (Oath) घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. आजचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रि‍पदासाठी तर अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी होणार आहे. त्यामुळे आज हे दोघेच शपथ घेण्याची शक्यता असून उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (Shivsena) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी माध्यमांशी बोलतांना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आम्हाला अजून काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. पण आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल. बाकीच्या मंत्र्याचा शपथविधी ७ किंवा ११ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी दिलेला वेळ कमी आहे,तेवढ्या वेळेमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी उरकणार नाही त्यामुळे कदाचित फक्त तिघांचा शपथविधी होईल, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

तसेच मंत्रिपदाच्या वाटपावरून कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं (Ministries) येणार याबाबतची चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावी असे वाटते.त्यानुसार चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला किती खाती मिळतील यावर बोलताना त्यांनी सांगितले की, वजनदार खाती सर्वच आहेत. त्यामध्ये सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंना दिला आहे.ते जे काही करतील ते पक्षाच्या हितासाठी करत आहेत. ते योग्य खाती घेतील असं मला वाटते. तसेच भविष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातील”, असेही भरत गोगावले म्हणाले.

मंत्रिमंडळात किती मंत्र्यांचा समावेश असू शकतो?

महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्यमंत्र्यासह एकूण ४३ मंत्र्यांची क्षमता आहे. मात्र, कॅबिनेट आणि राज्यमंत्री या दोन्हींची एकत्रित संख्या यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आतापर्यंत तिन्ही पक्षांचे २८ मंत्री होते. यामध्ये भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री होते.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत एकनाथ शिंदेंमध्ये नाही”; शपथविधीआधी राऊतांनी डिवचलं

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या