Wednesday, June 17, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : महायुतीच्या मंत्र्यांची थेट राज्यपालांकडे तक्रार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी...

Maharashtra Politics : महायुतीच्या मंत्र्यांची थेट राज्यपालांकडे तक्रार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली भेट, काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसात महायुती सरकारमधील (Mahayuti Government) मंत्री आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राज्याची बदनामी होत असून, अशा बेजबाबदार मंत्र्यांचा (Ministers) तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी आज (सोमवार) शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांनी राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत केली.

- Advertisement -

यावेळी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांनी (Shivsena UBT Leader) पत्राद्वारे राज्यपालांकडे (Governor) दिली. तसेच मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती देखील त्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमोर मांडली.

तसेच राज्यातील हनीट्रॅप प्रकरण (Honeytrap Case) ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण , मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरणासंदर्भात राज्यपालांकडे शिवसेना (उबाठा ) पक्षाच्या नेत्यांनी पत्राद्वारे (Letter) माहिती दिली.

दरम्यान, याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुष्माताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर,नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...