Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Vidhan Parishad Election 2026 : पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ; नांदेड, छत्रपती...

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ; नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रायगडमध्ये बंडखोरी

पुण्यात अजित पवार गटाचे दोन उमेदवार

मुबंई | प्रतिनिधी | Mumbai

विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षात अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar) पुण्याच्या उमेदवारीवरून संभ्रम असून येथे दोन जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. अहिल्यानगर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रायगडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून अशी असून या नंतरच विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यापैकी पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उद्योजक संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम यांनी तसेच माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? यावर अजित पवार गटात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणी लंके, काँग्रेसच्या करण ससाणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मच्छिद्र धुमाळ यांनी अर्ज भरले आहेत.

यवतमाळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात उमेदवारीवरून गोंधळ आहे. येथे दुष्यन्त चतुर्वेदी आणि मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड असे दोन दोघांनी अर्ज भरले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. तर रायगड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.

प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार नांदेड मतदारसंघातून रामदास पाटील-सुखटनकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचवेळी माजी आमदार माधवराव पाटील-जळगावकर यांचा यादीत अपक्ष म्हणून उल्लेख आहे. नांदेडमध्ये भाजपकडून अमर राजूरकर यांनी अर्ज भरला असून येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील-अष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा यांनी बंडखोरी केली आहे. तर रायगड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून शैलेश अग्रवाल, भंडारा-गोंदियातून माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून प्रफुल अग्रवाल, नरेश ईश्वरकर यांचा यादीत उल्लेख आहे. यवतमाळ साहेबराव दत्तराव कांबळे, अमरावती येथून हर्षदीप देशमुख, नागपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले असे दोघांनी अर्ज भरले आहेत. धाराशिव-लातूर-बीड मधून महेश देशमुख, सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या हॉटेल कामत समोर रविवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने....