Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; कोणत्या...

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गेली अनेक वर्षे रखडलेल्या विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Election) येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी (Vote Counting) २२ जून रोजी होऊन निकाल जाहीर केले जातील. निवडणूक जाहीर झाल्याने मतदारसंघांत (Constituencies) राजकीय हालचालींना वेग आला आहे.

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने सोमवारी विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्याचवेळी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पोटनिवडणूक (Nagpur Local Government Constituency By Poll Election) घेण्याचे आयोगाने घोषित केले आहे. त्यामुळे नागपूर पोटनिवडणुकीसह एकूण १७ जागांसाठी एकाच वेळी मतदान होईल. निवडणूक होऊ घातलेल्या मतदारसंघातील जागा १ जानेवारी २०२२ ते २९ ऑगस्ट २०२५ यादरम्यान रिक्त झाल्या होत्या.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election 2026 : भाजप-शिंदेसेनेतच होणार लढत; भाजपचे १६४ तर शिंदेकडे १५९ संख्याबळ, सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

करोनाचे संकट, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गाचे आरक्षण यामुळे प्राधिकारी मतदारसंघाची मुदत संपूनही त्यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत. यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांबाबतचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला सादर केला होता. या प्रस्तावाच्या आधारे निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी घोषित केला. या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करणार आहेत.

मतदारसंघ आणि कंसात मतदारसंख्या

सोलापूर (५९५), अहमदनगर (४६१), ठाणे-पालघर (१०५४), जळगाव (५२६), सांगली सातारा (८५३), नांदेड (४३२), यवतमाळ (४०५), पुणे (७९८), भंडारा – गोंदिया (४५७), रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग (९४७), नाशिक (५८१), वर्धा- चंद्रपूर गडचिरोली (९७७), अमरावती (४५३), उस्मानाबाद-लातूर-बीड (१०५१), परभणी तथा हिंगोली (४६८) औरंगाबाद तथा जालना (५८०) आणि नागपूर (७६१)

हे देखील वाचा : Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; नाशिकसह ‘या’ मतदारसंघांमध्ये रणधुमाळी, १८ जूनला मतदान, मतमोजणी कधी?

विधानपरिषदेच्या कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला होता

प्रशांत प्रभाकर परिचारक, अरुणकाका बालभीमराव जगताप, रवींद्र सदानंद फाटक, चंदूभाई व्ही. पटेल मोहनराव श्रीपति कदम, अमरनाथ अनंतराव राजूरकर, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, अनिल शिवाजीराव भोसले, डॉ. परिणय रमेश फुके, अनिकेत सुनील तटकरे, नरेंद्र भिकाजी दराडे, रामदास भगवानजी आबिटकर, प्रवीण रामचंद्र पोटे, सुरेश धस, विप्लव गोपीकिसन बजोरिया, अंबादास दानवे

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना जारी करणे : २५ मे
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत : १ जून
उमेदवारी अर्जाची छाननी : २ जून
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत : ४ जून
मतदान : १८ जून (सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी : २२ जून

ताज्या बातम्या

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यावर रोहित पवारांची पोस्ट...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या गुप्त भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण...